TRENDING:

महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण, एका अफेअरमुळे 4 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त

Last Updated:

Nashik News: शुक्रवारी नाशिक शहरातील गंगापूर रोड भागात प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी आयुष्याचा शेवट केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: शुक्रवारी नाशिक शहरातील गंगापूर रोड भागात प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांचे पती आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डॉ. निलेश जेजुरकर फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
News18
News18
advertisement

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मनीषा यांचे पती निलेश यांचं एका महिला डॉक्टरसोबत अनैतिक संबंध सुरू होते. याची माहिती मनीषा यांना समजली होती. यातून जेजुरकर दाम्पत्यामध्ये मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. घरात वाद असूनही निलेश यांचं अफेअर बंद होत नव्हतं. उलट या अफेअरमुळे निलेश हा मनीषा यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. याच छळाला कंटाळून मनीषा यांनी शुक्रवारी ७ मार्च रोजी आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

advertisement

निलेश जेजुरकर याचं एका महिला डॉक्टरशी सुरू असलेल्या अफेअरमुळे एकूण चार आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. या प्रकरणामुळे मनीषा यांचा जीव तर गेलाच, शिवाय निलेशवरही गुन्हा दाखल झाला आहे. तो सध्या फरार आहेत. तसेच या दाम्पत्याला दोन मुली आहेत. आईचा मृत्यू आणि वडील फरार, यामुळे या दोन्ही मुली देखील पोरक्या झाल्या आहेत.

advertisement

पोलीस तक्रारीत नेमकं काय म्हटलं आहे?

डॉ. मनीषा यांची बहीण प्रा. रोहिणी थोरात यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत खळबळजनक आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, डॉ. निलेश जेजुरकर हे मनीषा यांचा दीर्घकाळापासून मानसिक छळ करत होते. निलेश यांचे दुसऱ्या एका महिला डॉक्टरशी अनैतिक संबंध होते. या संबंधांमध्ये मनीषा अडथळा ठरत असल्याने, त्यांना मानसिक त्रास दिला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच छळाला कंटाळून डॉ. मनीषा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

पोलिसांनी विविध कलमांतर्गत निलेश जेजुरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच निलेश जेजुरकर फरार झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि गंगापूर रोड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. एका उच्चशिक्षित आणि प्रसिद्ध महिला डॉक्टरने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण, एका अफेअरमुळे 4 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल