गुप्त माहितीच्या आधारे सापळा
गंगापूर गावाजवळील एका मोकळ्या जागेत काही संशयास्पद तरुण लोखंडी पाईपमध्ये लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार घनश्याम भोये यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पथक तयार करून परिसराला वेढा घातला आणि तौफिक हाशमी (रा. श्रमिकनगर) व समीर गुंजाळ (रा. गोवर्धन) या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले.
advertisement
लग्नाचं आश्वासन दिलं, गोळ्या खाल्ल्या अन् महिलेसोबत..., पोलिसाचं भयानक कांड, बीड हादरलं!
पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त
दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी या शस्त्राबाबत अधिक विचारपूस केली असता, हाशमी याने हे पिस्तूल संजीव नगरमधील फैजान शेख याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्परतेने फैजानचा शोध घेऊन त्यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
मोबाईल लुटीच्या गुन्ह्याचा उलगडा
संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरात मोबाईलची जबरी लूट केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस, लुटलेला एक महागडा मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. दरम्यान, या टोळीने शहरात आणखी काही गुन्हे केले आहेत का? तसेच फैजान शेख याने ही शस्त्रे कोठून आणली होती, याचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत.






