TRENDING:

Sinhastha Kumbhamela 2027: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय; कुंडासाठी आहे 'अशी' खास योजना

Last Updated:

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिराच्या मध्यभागी असणाऱ्या कुंडाची साफसफाई केली जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे सध्या सुरू आहेत. विकास कामांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिराच्या मध्यभागी असणाऱ्या कुंडाची साफसफाई केली जाणार आहे. कुंडाच्या जलशुद्धीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कुशावर्त कुंडचे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जलशुद्धीकरण आणि पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आले आहे.
News18
News18
advertisement

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले लाखो भाविक आवर्जुन त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी असलेल्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी आवर्जुन येतात. त्याच कुंडाची आता जलशुद्धीकरण केले जाणार आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत त्या कुंडाचे जलशुद्धीकरण आणि पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी कंपनीअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे कुंभमेळ्यामध्ये कुंडातील पाणी अधिक स्वच्छ आणि स्नान करण्यायोग्य ठेवले जाणार आहे.

advertisement

सामान्य वेळी कुंडातील पाण्याचे पुन:र्वापर चक्र 9 तासांचे आहे, पण कुंभमेळ्याच्या दिवसांमध्ये 3 तासांपेक्षाही कमी केले जाणार आहे. भाविकांच्या दृष्टीने मंदीर प्रशासनाने, स्थानिक प्रशासनाने आणि राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवाय, कुंभाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर भाविक निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये सोडून देतात. पण आता त्यासाठीही प्रशासनाकडून स्वतंत्र्य व्यवस्था केली जाणार आहे. 2027 मध्ये, कुंभमेळ्याला सुरूवात होणार असून कुंभमेळ्याच्या ध्वजारोहनाचा कार्यक्रम ऑक्टोबर 2026 मध्ये होणार आहे. त्या आधीच कुंभमेळ्यासंबंधीचे सर्व कामं

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कुलरची गार हवा तुमच्या जीवावर बेतू शकते! अशी चूक करू नका!
सर्व पहा

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, कुशावर्त कुंडाला भाविकांकडून विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. पाणी केवळ स्वच्छ असणे नव्हे, तर ते स्वच्छ दिसणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सिंहस्थ 2027 च्या अनुषंगाने भाविकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्य पुरातत्त्व विभागाकडून कुशावर्त परिसराचे जतन आणि संवर्धन तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. यात मंदिरांचे जीर्णोद्धार, पायऱ्यांची दुरुस्ती, कपडे बदलण्याच्या खोल्या तसेच संपूर्ण परिसरात प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील एकूण नऊ पवित्र स्थळांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये इंद्रकुंड, बिल्वतीर्थ, प्रयागतीर्थ, मुकुंदेश्वर तीर्थ, संगम तीर्थ, गौतमेश्वर मंदिर आणि गौतमेश्वर तलाव यांचा समावेश आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Sinhastha Kumbhamela 2027: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय; कुंडासाठी आहे 'अशी' खास योजना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल