TRENDING:

Sinhastha Kumbhamela 2027: कुंभमेळ्याला कसं जायचं? रेल्वे तिकिटच सांगेल सर्व काही, वाचा सविस्तर

Last Updated:

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर त्याच दृष्टीने कुंभमेळ्याची तयारी केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक ठिकाणी सध्या विकासकामे सुरू आहेत. रस्ते, रामकुंड, नदीवरील पूल, फ्लाय ओव्हर ब्रिज आणि रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात आहे. प्रत्येक कामाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जात असताना आता अशातच रेल्वेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभामध्ये रेल्वेच्या तिकिटावर रेल्वे प्रवाशांना 'कलर कोडिंग'चं तिकिट दिलं होतं. आता त्याचप्रमाणे नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 'कलर कोडिंग'चं तिकिट मिळणार आहे.
News18
News18
advertisement

प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'कलर कोडिंग'चं तिकिट प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं असणार आहे. प्रवाशांसाठी होल्डिंग एरिया, प्लॅटफॉर्म तिकिट, संबंधित रेल्वे स्टेशन आणि परिसर या गोष्टींसाठी वेगवेगळे तिकिटे लागणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या रंगाचे तिकिट असणार आहे. फक्त तिकिटाचा रंग पाहूनच प्रवाशांना माहिती कळू शकणार आहेत. प्रवाशांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असणार आहे. प्रवाशांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे सुलभ होणार असून गर्दी सुद्धा नियंत्रणात ठेवणं शक्य राहणार आहे. प्रयागराजमधील महाकुंभाप्रमाणेच नाशिक कुंभमेळ्याचेही नियंत्रण केले जाणार आहे.

advertisement

कुंभमेळ्याच्या दृष्टीने भुसावळ विभागामध्ये, देवाळाली कॅम्प, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि निफाड या पाच रेल्वे स्टेशनचा समावेश होतो. या पाचही रेल्वे स्टेशनचा कायापालट एकाच वेळी केला जात आहे. यामध्ये, प्रवाशांना थांबण्यासाठी होल्डिंग एरियाच्या विस्तारिकरणाचे काम हाती घेतले गेले आहे. देशभरातून येणार्‍या सर्व भाविकांना भुसावळ जंक्शनमधल्या रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांना पुढे कुंभमेळ्याच्या ठिकाणी नेले जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी नियंत्रणात राहणार आहे. शिवाय, इतरत्र कोणत्याही घटनांची परिस्थिती उद्भवणार नाही, या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाला येईल रुचकरपणा, कमी वेळेत बनवा पारंपरिक पाटवडी, रेसिपीचा Video
सर्व पहा

लाल, निळा, हिरवा, पिवळा यांसह अनेक कलर रेल्वे स्टेशन परिसरातील परिसर आपल्याला दाखवेल. या वेगवेगळ्या रंगाच्या तिकिटांमुळे भाविकांना कोणत्या इच्छित स्थळी जायचे आहे, हे सांगणं सहज शक्य होणार आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना भाविकांना अचूक आणि लगेचच माहिती सांगणं शक्य होणार आहे. या योजनेसंबंधी रेल्वेकडून संशोधन आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Sinhastha Kumbhamela 2027: कुंभमेळ्याला कसं जायचं? रेल्वे तिकिटच सांगेल सर्व काही, वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल