TRENDING:

Nashik Maha Kumbh: सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम कुठपर्यंत आलं? मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा, अधिकाऱ्यांना नवे निर्देश

Last Updated:

सिंहस्थ कुंभमेळा 2026- 27 च्या निमित्त विकासकामांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: 2026-27 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे. सध्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे केली जात आहेत. या विकासकामांचा आढावासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांकडून सध्या अनेक विकासकामांचा शुभारंभ केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा घेतला गेला.
News18
News18
advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीला आणि नाशिक महानगर पालिकेला पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीमध्ये आज मुख्यमंत्र्यांकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला. सोबतच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील पाणी स्वच्छ राहण्यासाठी विशेष काळजी घेण्यासंदर्भात देखील निर्देश दिले आहे. कुंभमेळ्याच्या दिवसांमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकराचा देशी जुगाड, गोडतेलावरची फ्यूल चूल, 7 रुपयांत एक तास चालणार!
सर्व पहा

सोबतच, प्रशासनाकडून कुंभमेळ्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. दरम्यान, नुकतंच मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात अर्थसंकल्प मांडलं. यावेळी कुंभमेळ्यासाठी धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि सामाजिक समतेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे, सोबतच एकात्मिक विकास आराखडा सुद्धा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून गोदावरी नदीची स्वच्छता, त्र्यंबकेश्वरमध्ये अमृतस्नानासाठी पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसह इतरत्रही शहरातील पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन, शहरातील प्रमुख बस डेपो, रिंग रोड यांच्या कामाचा आढावा घेत त्यांचेही लवकरात लवकर काम पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Maha Kumbh: सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम कुठपर्यंत आलं? मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा, अधिकाऱ्यांना नवे निर्देश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल