TRENDING:

New Rent Rule : घरमालकांसाठी धोक्याची घंटा; 'हे' काम न करता घर भाड्याने देणे पडणार महागात

Last Updated:

New Rent Agreement Rule 2025 :नवीन भाडे करार 2025 नुसार दोन महिन्यांत नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ठरलेल्या वेळेत करार नोंदणी न केल्यास घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही दंड आकारला जाईल

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील वर्षानुवर्षांचे वाद संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशभरात 'नवीन भाडे करार 2025' 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे. यामुळे आता भाडे बाजारात शिस्त, सुरक्षितता आणि कायदेशीर व्यवहार होणार आहेत.
भाड्याची नवी नियमावली: 'नोटीसशिवाय बेदखली' गैरकायदेशीर; डिपॉझिट मर्यादा केवळ २ महिन्यांवर!
भाड्याची नवी नियमावली: 'नोटीसशिवाय बेदखली' गैरकायदेशीर; डिपॉझिट मर्यादा केवळ २ महिन्यांवर!
advertisement

प्रमुख बदल आणि भाडेकराराच्या नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे:

1-नोंदणी अनिवार्य आणि वेळेची मर्यादा:आता प्रत्येक भाडेकरार दोन महिन्यांत नोंदवणे बंधनकारक आहे.नोंदणी न केल्यास घरमालक आणि भाडेकरू या दोघांनाही ₹5,000/- दंड आकारला जाईल. नोंदणीची जबाबदारी दोघांचीही संयुक्त असेल.

डिपॉझिट (अनामत रक्कम) मर्यादा:

1- घरमालकांना डिपॉझिट म्हणून केवळ दोन महिन्यांचे भाडे घेता येईल.

2-काही शहरांमध्ये 6 ते 12 महिन्यांचे डिपॉझिट मागितले जात होते, त्यावर आता कायदेशीर बंदी येणार आहे.

advertisement

जलद वाद निवारण 'भाडे लवादा'द्वारे:

1-भाडे थकवल्यास किंवा अटी मोडल्यास घरमालकाला थेट न्यायालयात न जाता 'भाडे लवादाकडे' (Rent Tribunal) जाण्याचा अधिकार मिळेल.

2- या नव्या तरतुदीमुळे भाडेकरू-घरमालक यांच्यातील कोणताही वाद केवळ 60 दिवसांत निकाली काढणे बंधनकारक असेल, ज्यामुळे वर्षांनुवर्षे चालणाऱ्या प्रकरणांना आळा बसेल.

नोटीस बंधनकारक

1-भाडेवाढ करण्यापूर्वी किंवा भाडेकरूला घर खाली करण्यास सांगण्यापूर्वी किमान 30 दिवसांची लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.

advertisement

2- नोटीस न देता बेदखली करणे किंवा भाडेवाढ करणे 'गैरकायदेशीर' मानले जाईल.

अशी असेल नोंदणी प्रक्रिया

नवीन भाडे करार नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे.

1. आवश्यक कागदपत्रे: घरमालक व भाडेकरू यांचा आधार/ओळखपत्र, मालमत्तेचा पत्ता व तपशील, कराराचा कालावधी व भाड्याचे दर.

2. अर्ज: संबंधित राज्याच्या ऑनलाइन 'ई-रजिस्ट्रेशन' पोर्टलवर अर्ज करणे.

advertisement

3. पडताळणी: आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करणे.

4. करार उपलब्धता: नोंदणी शुल्क भरल्यानंतर करार तत्काळ उपलब्ध होईल.

5. . भाडे कराराची ऑनलाइन ई-रजिस्ट्रेशन प्रक्रिया साठी संकेत स्थळ.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मन होईल तृप्त, फक्त 40 रुपयांत खा चविष्ट खिचा पापड, मुंबईत हे आहे ठिकाण
सर्व पहा

देशातील अनेक राज्यांनी भाडे करारासाठी ऑनलाइन 'ई-रजिस्ट्रेशन' पोर्टल सुरू केले आहे (महाराष्ट्रात हे efilingigr.maharashtra.gov.in या IGR पोर्टलद्वारे केले जाते).

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
New Rent Rule : घरमालकांसाठी धोक्याची घंटा; 'हे' काम न करता घर भाड्याने देणे पडणार महागात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल