TRENDING:

Nashik News: सप्तश्रृंग गडावरील महाप्रसादात बदल, लाडूची विक्री थांबवली अन्... नेमकं कारण काय?

Last Updated:

सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्टतर्फे भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसादामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मंदीर ट्रस्टने इतका महत्त्वाचा निर्णय का घेतला? कारण काय, जाणून घेऊया...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ अख्ख्या जगाला बसत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा नागरिकांना तुटवडा भासत आहे. हॉटेलसह, खाणावळींना आणि देवस्थानांना सुद्धा आता गॅसच्या तुटवड्याचा फटका बसतोय. सध्या चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंग गडावर दररोज लाखो भाविकांची रेलचेल पाहायला मिळते. चैत्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या सप्तश्रृंग गडावर कार्यक्रमांना गॅस सिलिंडरचे ग्रहण लागले आहे. सप्तश्रृंग देवीच्या ट्रस्टने अपुऱ्या गॅस सिलिंडरसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवीच्या महाप्रसादाबद्दल मंदीर ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
News18
News18
advertisement

व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे सप्तश्रृंग गडावरील लाडू प्रसाद तयार करणे संपूर्णपणे थांबवली आहे. उपलब्ध साठा संपल्यानंतर लाडूची विक्री सुद्धा बंद करण्यात आली आहे. शिवाय, सशुल्क व्हीआयपी महाप्रसादालयही तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्टतर्फे दररोज हजारो भाविक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसादासाठी वरण- भात, पोळी, भाजी, बुंदी किंवा रव्याचा प्रसाद असा जेवणाचा मेन्यू असतो. पण गॅस टंचाईपासून वरण- भाताच्या ऐवजी मसाले भात, पोळी, भाजी, बुंदीचा प्रसाद असा जेवणाचा मेन्यू सध्या कायमचा ठेवलेला आहे.

advertisement

व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याचा फटका फक्त सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्टलाच बसलेला नसून गडावरील हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर बसलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक चूल पेटवून नाश्ता, चहा आणि जेवण बनवण्याचा पर्याय निवडला आहे. गॅस नाही तर किमान चूलीच्या माध्यमातून तरीही आपला उदरनिर्वाह पूर्ण करत आहेत. तर अनेकांना चूलीचा सुद्धा पर्याय शक्य नसल्यामुळे त्यांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सप्तश्रृंग देवीच्या गडावर अनेक भाविक महाप्रसादाच्या रूपाने मोफत जेवणाची व्यवस्था करून देत होते. परंतू आता गॅस तुटवड्यामुळे ते सुद्धा आता बंद झाले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाला येईल रुचकरपणा, कमी वेळेत बनवा पारंपरिक पाटवडी, रेसिपीचा Video
सर्व पहा

चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी देवीच्या गाभाऱ्यात लाखो भाविक येत आहेत. भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असताना अशातच गॅस तुटवड्याचा प्रश्न समोर येऊन उद्भवला आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे चैत्रोत्सवाच्या नियोजनावर ताण पडला आहे. गॅस तुटवड्यातही सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्ट वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढत भाविकांसाठी जेवणाची सोय करून देत आहे. जेवणाच्या मेन्यूमध्ये दिवसेंदिवस कमी करत गॅस सिलिंडरची बचत देवीच्या ट्रस्टकडून केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: सप्तश्रृंग गडावरील महाप्रसादात बदल, लाडूची विक्री थांबवली अन्... नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल