TRENDING:

4 एप्रिलची जॉइनिंग अधुरीच, नाशिकच्या तरुणीचा करुण अंत, सोबतचे मित्रही नाही वाचवू शकले प्राण

Last Updated:

Nashik News: नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा प्रत्यय देणारी एक अतिशय हृदयद्रावक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nashik News: नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा प्रत्यय देणारी एक अतिशय हृदयद्रावक घटना नाशिकमध्ये घडली आहे. ज्या नोकरीसाठी रात्रंदिवस कष्ट केले, ज्या स्वप्नांसाठी मेहनत घेतली, ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्यापूर्वीच एका भीषण अपघाताने एका तरुण मुलीचा जीवन प्रवास कायमचा थांबवला. नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर परिसरात एका निवृत्त शिक्षकाच्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत २८ वर्षीय शीतल काशिनाथ खरोटे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
शितल खारोटे
शितल खारोटे
advertisement

नेमकी घटना काय?

जेलरोड परिसरातील शीतल खरोटे ही तरुणी ४ एप्रिलपासून एका नवीन नामांकित कंपनीत कामावर रुजू होणार होती. नवीन नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी तिला हक्काची दुचाकी हवी होती. याच स्वप्नापोटी ती शनिवारी दुपारी आपल्या मित्रांसह नाशिक-पुणे महामार्गावरील 'खुशी शोरूम' येथे दुचाकी पाहण्यासाठी आली होती. मात्र, त्याच वेळी खोडेनगरकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने शोरूमच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांना आणि तीन व्यक्तींना जोरदार धडक दिली.

advertisement

हा अपघात इतका भीषण होता की, शीतलचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे मित्र सनी पुरी आणि रवींद्र पुरी हे गंभीर जखमी झाले आहेत. निवृत्त शिक्षक ज्ञानदेव मोतीराम सोनवणे (५९) हे आपल्या पत्नीसह दशक्रिया विधी आटोपून परतत असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि हा अनर्थ घडला.

कुटुंबाचा आधार कोसळला

शीतलच्या मृत्यूने खरोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या घरी अर्धांगवायूग्रस्त वडील, आई आणि तीन मोठ्या बहिणी असा परिवार आहे. घरातील आर्थिक ओढाताण दूर करून ती कुटुंबाचा मुख्य आधार ठरणार होती. अवघ्या सात दिवसांनी ती नवीन प्रवासाला सुरुवात करणार होती, पण त्याआधीच काळाने तिच्यावर झडप घातली.

advertisement

प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर काटा

घटनेच्या वेळी शोरूममध्ये असलेले कर्मचारी अंकुश कुमावत यांनी सांगितले की, "अचानक मोठा आवाज झाला म्हणून आम्ही बाहेर धावलो. एका कारने अनेक दुचाकींना उडवले होते. आम्ही त्या मुलीला वाचवण्यासाठी धावलो, पण तिचा श्वास थांबला होता. ते दृश्य पाहून काळजात धस्स झाले." तर दुसरी प्रत्यक्षदर्शी सुनीता जाधव यांनी सांगितले की, कारने तरुणांना उडवल्यानंतर त्या मुलीची अवस्था पाहून त्यांचा थरकाप उडाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

या प्रकरणी उपनगर पोलिसांनी कारचालक निवृत्त शिक्षक ज्ञानदेव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात शोरूमबाहेर उभ्या असलेल्या ५ ते ६ दुचाकींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
4 एप्रिलची जॉइनिंग अधुरीच, नाशिकच्या तरुणीचा करुण अंत, सोबतचे मित्रही नाही वाचवू शकले प्राण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल