बडगुजर म्हणाले की, काल रविवारी रात्री एसीबीने अचानक माझ्या घरी छापा टाकला. रात्री दोन वाजेपर्यंत सर्च ऑपरेशन राबवलं. पण माझ्यावर ४२० गुन्हा दाखल केला हे माझ्या जिव्हारी लागलं. व्यक्तिगत आयुष्यात माझ्यावर एकही एनसीसुद्धा दाखल नाही असंही बडगुजर यांनी सांगितलं.
आईच्या मृत्यूनंतर घरात मुलगी सतत ओरडायची, शेजाऱ्यांनी चौकशी करताच बापाचं काळं कृत्य आलं समोर
advertisement
एसीबीने जे मुद्दे नोटीसीत मांडले त्या मुद्द्यातून मी दोषमुक्त झालो आहे. न्यायालयाने तशी ऑर्डरसुद्दा दिली आहे. पण ती ऑर्डर न बघता गुन्हा कसा दाखल केला असा प्रश्न बडगुजर यांनी विचारला आहे. यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करत आहे? असा प्रश्न बडगुजर यांनी उपस्थित करताना म्हटलं की, पोलिसांनी संयम ठेवायला हवा. या पूर्वी देखील दिपाली खन्ना नावाच्या अधिकाऱ्याने पालिका कर्मचारी वादात गुन्हा दाखल केला याही प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारले.
माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर मी एसीबी कार्यालयाबाहेर आत्महत्या करेन असा इशाराही बडगुजर यांनी दिला. असलं नालायक राजकारण करू नये. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही मागे हटणार नाही असे बडगुजर म्हणाले.