नाशिक - नाशिक जिल्ह्यातील वणी गडावरील आदिशक्ती आई शृप्तशुंगी देवीला साडेतीन शक्ती पिठांपैकी एक शक्तीपीठ मानले जाते. संपूर्ण भारतातून भाविक भक्त याठिकाणी देवीच्या दर्शनाला येतात. देवीला केलेली प्रार्थना पूर्ण होते, अशी भाविकांची मान्यता आहे. पण याच नाशिक येथील एका भाविकाला या देवीने साक्षात्कार करून दर्शन दिले आहे, असेही सांगितले जाते. नाशिक येथील जुन्या नाशिकात मधल्या होळी परिसरातील मोरे वाड्यात देवी शृप्तश्रृंगी देवीचे चमत्कारी रुप आजही पाहायला मिळते. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
या मोरे वाड्यात आता मोरे कुटुंबीयांची सातवी पिढी राहत आहे. याबाबत मोरे कुटुंबातील सदस्य यश मोरे यांनी माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ही देवी या ठिकाणी असण्याची आख्यायिका सांगितली जाते. आमचे पूर्वज नित्य नेमाने आई शृप्तशुंगीची पूजत करत आले आहेत. त्यामुळे आम्ही परंपरेने मातेला मानत आलो आहोत. आमच्या पूर्वजांपासून या देवीचे आमच्या वाड्यात स्थान आहे.
पूर्वजांपासून माहिती मिळाल्याप्रमाणे आमचे आधीचे पूर्वज हे नित्यनेमाने दर पौर्णिमेला वणी येथील देवी शृप्तश्रृंगीच्या दर्शनाला जायचे. नित्यनेमाने रोज तिला भजायचे. एकदा जुन्या पिढीतील एका पूर्वजाला आईने साक्षात्कार दिला होता. ते नियमित गडावर जात होते. पण वयानुसार आणि प्रकृतीनुसार तिथपर्यंत जाणे त्यांना शक्य झाले नसावे. याकरिता देवीने त्यांना साक्षात्कार केला. तसेच देवी म्हणाली की, तुला या ठिकाणी यायची गरज नाही. मी स्वतः तुझ्या घरी येईल.
नवरात्रीत वापरा प्युअर खादीच्या साड्या, ठाण्यातील हे लोकेशन आहे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन
दरम्यान, एकदा सर्व झोपेत असताना त्यांना काही तरी पडण्याचा आवाज आला. त्यांनी उठून पाहिले असता साक्षात आई सप्तश्रृंगी ही वाड्यात अवतरली होती. तेव्हापासून देवीमाता याच वाड्यात आहे. पूर्वज असल्याने नावे सांगता येणार नाहीत. परंतु आज आमची ही सातवी पिढी या ठिकाणी राहते आणि आमच्या अगोदर पासूनच या देवीचे या ठिकाणी स्थान आहे, अशी माहिती मोरे कुटुंबीयांच्या सातव्या पिढीतील सदस्य यश मोरे यांनी दिली.
आजही याठिकाणी देवीच्या दर्शनाला भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच साकडेही घालतात. ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. नवरात्रीत या ठिकाणी मोठे हवन पूजन केले जाते, असेही त्यांनी सांगितले.
सूचना - वर दिलेली माहिती ही आख्यायिकेवर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. तसेच लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.