याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकांक्षा रणशूर ही तिच्या दोन चिमुकल्यांसह पतीसोबत माहेरी आली होती. धोंड्याच्या जेवणासाठी आली असताना कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घराच्या टेरेसवर पेरू तोडण्यासाठी गेले असताना हातातली लोखंडी वस्तू उच्च दाबाच्या वायरला लागली. त्यानंतर वीजेचा जबरदस्त असा शॉक मायलेकींना बसला.
दारुसाठी मित्र पैसे देईना, डोक्यात दगड घालून केला खून; स्वत:च पोलिसांसमोर झाला हजर
advertisement
मीना सोनवणे आणि आकांक्षा रणशूर यांच्यासोबत तेव्हा पती राहुल रणशूर आणि दोन मुलेही होती. मीना आणि आकांक्षा यांना शॉक बसला तेव्हा पाण्याची टाकी फुटली आणि वीजेचा प्रवाह बंगल्यात उतरला. पती राहूल रणशूर आणि दोन्ही मुले यावेळी बाजूला फेकली गेली त्यामुळे ते वाचले.
घटनेनंतर ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पिंपळगाव इथं पाठवण्यात आले आहेत. मृतदेहांवर सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या प्रकरणाची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.