दारुसाठी मित्र पैसे देईना, डोक्यात दगड घालून केला खून; स्वत:च पोलिसांसमोर झाला हजर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
दहा रुपयांमध्ये दारू मिळते का यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले आणि यानंतर या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यातूनच आरोपीने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला.
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट : शहरातील पुंडलिक नगर भागात किरकोळ वादातून दारुच्या नशेत तरुणाचा खून झाल्याची घटना घडलीय. शनिवारी रात्री 11:40 वाजता घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव रोहित चौधरी असल्याची माहिती समोर आलीय. डोक्यात गट्टू घालून त्याने दारुड्या तरुणाचा खून केलाय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद होऊन डोके ठेचून ही हत्या करण्यात आली. रोहीत चौधरी असे आरोपीचे नाव आहे. रात्री पुंडलिक नगर भागातील एका बार समोर या दोन तरुणांमध्ये अचानक वाद सुरू झाला. दहा रुपयांमध्ये दारू मिळते का यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले आणि यानंतर या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यातच आरोपी रोहितने जवळील गट्टू उचलून समोरील तरुणांच्या डोक्यात घाव घातले. या घटनेनंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला तर तरुणाचा जागीच मृत्यू झाला
advertisement
खून झालेला तरुण युपीचा असल्याची माहिती समजते. दोघांनीही एकत्र दारू प्यायल्यानंतर दौलत बंगला इथल्या रुग्णालयासमोर बोलत थांबले होते. तेव्हा रोहितने दारुसाठी पैसे मागितले. ते देण्यास नकार मिळताच रोहितने मित्राच्या डोक्यात दडगाचा गट्टू घातला. यात मित्राच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर रोहित पोलिसांसमोर स्वत: हजर झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमीला रुग्णालयात नेले. पण त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2023 4:08 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
दारुसाठी मित्र पैसे देईना, डोक्यात दगड घालून केला खून; स्वत:च पोलिसांसमोर झाला हजर