धाराशिवमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, वडिलांनी व्यक्त केली घातपाताची शंका

Last Updated:

प्रेमच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी शंका व्यक्त केलीय. मुलाला मारहाण करून त्याला लटकावलं असल्याचा आरोप प्रेमच्या वडिलांनी केलाय.

News18
News18
धाराशिव, 06 ऑगस्ट : धाराशिवमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर कुटुंबियांनी मात्र यात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. धाराशिवमधल्या वाणेवाडी गावात ही घटना घडली असून अद्याप पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारशिवमध्ये नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रेम शिंदे हा विद्यार्थी शिकत होता.  दहावीत शिकणाऱ्या प्रेमने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलंय. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
advertisement
प्रेमच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी शंका व्यक्त केलीय. मुलाला मारहाण करून त्याला लटकावलं असल्याचा आरोप प्रेमच्या वडिलांनी केलाय. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याबाबत आता संशय बळावलाय. ढोकी पोलिसांनी काका महाराज उमरे यांना या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे पण गुन्हा दाखल केलेला नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
धाराशिवमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, वडिलांनी व्यक्त केली घातपाताची शंका
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement