TRENDING:

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा रद्द, मेट्रो-3, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कधी होणार? समोर आली अपडेट

Last Updated:

PM Modi Mumbai Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 30 सप्टेंबर रोजी होणार मुंबई दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा रद्द, मेट्रो-3., नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कधी होणार? समोर आली अप़डेट
पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा रद्द, मेट्रो-3., नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कधी होणार? समोर आली अप़डेट
advertisement

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 30 सप्टेंबर रोजी होणारा मुंबई दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो-3 अॅक्वा लाईनचा पुढील टप्पा, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. त्याबाबतची नवी माहिती समोर आली आहे.

advertisement

बहुप्रतिक्षित अशा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन अखेर महिनाभर पुढे ढकलण्यात आले आहे. आता या विमानतळाचे उद्घाटन 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. यापूर्वी 30 सप्टेंबरला नवी मुंबई विमानतळ आणि मुंबईतील मेट्रो-3 च्या आचार्य अत्रे चौक वरळी ते कफ परेड या टप्प्याचे लोकार्पण एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलला गेल्याने उद्घाटनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

advertisement

दरम्यान, मेट्रो-3 च्या पुढील टप्प्याचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाहतुकीचा मोठा दिलासा वेळेतच मिळणार आहे. त्यानंतर आरे जेव्हीएलआर ते कफ परेड हा मुंबई मेट्रो-3 अॅक्वा लाइन पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सध्या ही मेट्रो आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक वरळी या दरम्यान धावत आहे.  कुलाबा ते आरेपर्यंत धावणारी 33.5 किलोमीटर लांबीची मुंबई मेट्रो-3 (ॲक्वा लाईन) सुरू झाल्यानंतर दररोज लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे  शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल. 

advertisement

ॲक्वा लाईन ही मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आहे. संपूर्ण 33.5 किमीच्या मार्गावर एकूण 27 स्टेशन आहेत. त्यापैकी तब्बल 26 स्टेशन भूमिगत आहेत. अंतिम टप्प्यात 11 नवीन स्टेशन प्रवाशांसाठी खुले होणार आहेत.

नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनात विलंब झाला असला तरी त्याच्या कार्यान्वयनासाठीची तयारी वेगाने सुरू आहे. प्रशासनाकडून विमानतळ परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने गतीने हालचाली सुरू आहेत. एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर यांनी प्रारंभीच्या टप्प्यातच या विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा रद्द, मेट्रो-3, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कधी होणार? समोर आली अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल