मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मोतलिंग यांच्या आई काशी यात्रेला गेल्या होत्या. ही यात्रा पूर्ण करून त्या पुन्हा मुंबईत परतल्या होत्या. यावेळी परतीच्या प्रवासात त्या रिक्षातून आपल्या जुहगाव येथे घरी येत होत्या.या दरम्यान त्यांच्याकडे खूप सामान होते. या प्रवासात त्या एक बॅग रिक्षातच विसरला. त्यानंतर घरात आल्यावर त्यांना कळालं की ज्या बॅगेत 16 लाख किमतीचे दागिने होते तीच बॅग त्या रिक्षात विसरून आल्या होत्या. त्यामुळे त्या प्रचंड तणावात आल्या होत्या.त्यानंतर त्यांनी ही माहिती आपल्या कुटुबियांना दिली होती. त्यानुसार त्यांनी रिक्षाचा शोध सूरू केला होता.
advertisement
महिला विसरलेल्या या बॅगेत मंगळसूत्र,चार अंगठ्या, पैंजण आणि इतर दागिने असा मिळून सुमारे 16 लाख रुपयांचा मुद्देमाल होता. त्यामुळे संतोष मोतलिंग यांच्या आईंना मोठा धक्का बसला होता.या घटनेनंतर रिक्षाचालकाची शोधाशोध सूरू केली.पण त्यांचा थांगपता लागत नव्हता.
दरम्यान रिक्षाचालक संतोष शिर्के यांना त्यांच्या रिक्षात एका प्रवाशाची बॅग रिक्षात राहुन गेल्याचे कळताच त्यांनी तत्काळ ही बाब रिक्षा युनियन आणि पोलिसांना कळवली.त्यानंतर पोलिसांच्या मदतीने मुळ मालकाचा शोध घेण्यात आला.त्यानंतर रिक्षाचालक संतोष शिर्के यांनी प्रवाशाची हरवलेली सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली तब्बल 16 लाख रुपयांची बॅग मूळ मालकाला परत केली आहे. त्यामुळे प्रवाशाच्या अशा कठीण समयी रिक्षाचालकाने दाखवलेल्या माणुसकीचे प्रचंड कौतुक होत आहे. या घटनेची आता नवी मुंबईत चर्चा आहे.
