TRENDING:

अशोक खरातसारखा नवी मुंबईतला आदर्श म्हात्रे, 40 पेक्षा जास्त महिलांना फसवलं, सिनेमा निघेल असं केलं कांड!

Last Updated:

जेव्हा पीडित महिला आपल्या जाळ्यात अडकली तेव्हा हा भामटा आदर्श म्हात्रे  या महिलांना ३५ ते ४० लाख रुपये होम लोन काढायला सांगायचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई: देशभरात एकीकडे बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. रोज या प्रकरणी नव नवीन माहिती समोर येत आहे. आता नवी मुंबईमध्ये अशोक खरात समोर आला आहे. एका ३५ वर्षीय तरुणाने राज्यातील अनेक महिलांना मॅट्रिमोनी साईटवरून हेरून फसवलं आहे. जवळपास ५० महिलांची या भामट्याने फसवणूक केली आहे या प्रकरणी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी ५० हुन अधिक गुन्हे दाखल आहे.
News18
News18
advertisement

नवी मुंबईमध्ये अशोक खरात सारखं प्रकरण समोर आलं आहे. आदर्श म्हात्रे असं या नराधमाचं नाव आहे.   ३५ वर्षीय आदर्श म्हात्रे  याने राज्यातील अनेक महिलांना ज्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, अशा महिलांना मॅट्रिमोनी साईटवरून हेरून त्यांना आपण इस्त्रोचा शास्त्रज्ञ असल्याचं किंवा IPS, IAS अधिकारी असल्याचं सांगून अनेक महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांना लुबाडलं आहे.

advertisement

मॅट्रिमोनी साईटवर महिलांना हेरायचा

विशेष म्हणजे,  जा ३० वर्षावरील महिला ज्यांच लग्नाचं वय निघून गेलेल असेल, घटस्फोटीत किंवा विधवा महिलांना मॅट्रिमोनी साईटवरून शोधून काढायचा ते ही वर्षाला २५ ते ३५ लाख वर्षाला पॅकेज घेणाऱ्या महिलांना. याच महिलांना आलिशान गाड्यांमधून पंचतारांकित हॉटेलमध्ये न्यायचा आणि त्यांच्या कलेनं बोलून आपला रुबाब दाखवत महिलांना आपलसं करायचा. त्यानंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुढे तो पैसे कसे लुबाडायचा याचा डाव टाकायचा.

advertisement

होम लोन काढायला लावायचा

जेव्हा पीडित महिला आपल्या जाळ्यात अडकली तेव्हा हा भामटा आदर्श म्हात्रे  या महिलांना ३५ ते ४० लाख रुपये होम लोन काढायला सांगायचा. पीडितेच्या नावाने होम लोन काढून ते पैसे आपल्या भावाच्या अकाउंटवर घ्यायचा. त्यानंतर पैसे घेऊन पसार व्हायचा. हे पैसे घेऊन तो गोव्याला मौजमजा  करायचा. या विकृताने सर्व महिलांना तो शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या हतबल करायचा. यामुळे आजपर्यंत जरी ४० गुन्हे दाखल झाले असले तरी ५० महिलांनी गुन्हे नोंदवण्यास नवी मुंबई पोलिसांना नकार दिला आहे. राज्यातील ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक आणि कर्नाटकमध्ये या आदर्श म्हात्रे विरोधात गुन्हे दाखल आहेत.

advertisement

आदर्शची बनावट नावं

धक्कादायक म्हणजे, आदर्शने आतापर्यंत अनेक महिलांना फसवलं आहे. प्रत्येकवेळी नवीन नाव आणि नवीन ओळख घेऊन तो महिलांना फसवायचा. आतापर्यंत त्याने स्वप्नील वारूळ, हेमंत गायकर, रुद्रेश गोंधळी, जयेश सोनवणे, जयेश नाईक, आदित्य म्हात्रे आणि तन्मय म्हात्रे अशी नावं धारण करून महिलांची फसवणूक केली आहे.

अशी होती आदर्श म्हात्रेची मोडस ऑपरेंटी

advertisement

- लग्नाच वय निघून गेलेल्या महिला, घटस्फोटीत, विधवा महिलांना टार्गेट करायचा

- वार्षिक २५ ते ३० लाखाच पॅकेज घेणाऱ्या महिलांना मैट्रिमोनीवरून शोधायचा

- इस्त्रोचा शास्त्रज्ञ असल्याचा सांगायचा

- आलिशान गाड्यांमधून महिलांवर प्रभाव टाकायचा

- आपल्या प्रेमाच्या जाळ्यात आल्यानंतर लैंगिक शोषण करून आर्थिक फसवणूक करायचा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

- फसवणूक केल्यानंतर मोबाईल नंबर बंद करायचा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरातसारखा नवी मुंबईतला आदर्श म्हात्रे, 40 पेक्षा जास्त महिलांना फसवलं, सिनेमा निघेल असं केलं कांड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल