निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एमआयएमची मान्यता रद्द करून असदुद्दीन ओवैसींना पाकिस्तानला फेकले पाहिजे, असे प्रत्युत्तर माजी खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना दिले. असदुद्दीन ओवैसी यांची अमरावती महापालिकेच्या प्रचारासाठी सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी राणा यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला राणांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
advertisement
देशाची डेमोग्राफी बदलतीये, ओवैसींनी त्यावर बोलावे
देशाची डेमोग्राफी बदलत जात आहे. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी बोलले पाहिजे. ते संसदेचे खासदार आहेत. संवेदनशील मुद्द्यावर त्यांनी निश्चित बोलले पाहिजे. तसेच देशात राहायचे असेल तर संविधानाला मानले पाहिजे, असेही राणा म्हणाल्या.
ओवैसींचं नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवलं पाहिजे
ओवेसी यांचे देशाचे नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवलं पाहिजे. तिथे जाऊन त्यांनी दहा नाही, वीस मुले त्यांनी जन्माला घालावी. ओवेसींच्या मनात काय विचार चालला आहे हे देशाला माहिती आहे. बदलत असलेल्या डेमोग्रसीवर त्यांनी बोलले पाहिजे. ते भारत माता की जय बोलत नाही. वंदे मातरम बोलत नाही, मग तुम्ही या देशाला काय मानता? असे राणा म्हणाल्या.
