भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढीमध्ये पुढील महिन्यामध्ये यात्रा सुरू होत आहे. या यात्रेमध्ये देवाचा प्रसाद धागे बनवणे तसेच इतर वस्तू मुस्लिम बांधव बनवत असतात आणि विकतही असतात.
धार्मिकतेचे कारण देत या ठिकाणी मुस्लिम समाज मढी देवस्थानचा पवित्र भंग करतो, असं कारण देत मढी ग्रामसभेने यावर्षी मुस्लिम बांधवांना व्यवसाय करू न देण्याचा ठराव घेतला आहे. त्यामुळे यावर्षी मुस्लिम बांधव त्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय करू शकत नाही, असे मढी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मरकड यांनी सांगितले.
advertisement
या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. भटक्यांची पंढरी म्हणजे जे वर्षभर फिरतात, आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम सर्व धर्मीय या यात्रेची वाट पाहत असतात.
इतिहासात आत्तापर्यंत अशी घटना कधी घडलेली नाही. कोणत्या धर्मियांवर बंदी घालावी, असे कधीच घडले नव्हते. हा तेथील ग्रामस्थांचा पण विषय नाही. उगाच दोन-तीन जणांना वाटलं म्हणून हा ठराव घेतला गेला. हे संविधानाच्या विरोधात आहे. याबाबत आपण प्रशासनाकडे दाद मागणार असून प्रशासनाने कारवाई केली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा प्रतापराव ढाकणे यांनी दिला आहे.
