राहुल नार्वेकर यांची प्रकृती बिघडल्याने गुरुवारी सुनावणी रद्द केली गेली. मात्र सुनावणीचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार २५ आणि २७ जानेवारी रोजी दोन्ही गटांचा अंतिम युक्तिवाद होणार आहे. तर विधानसभा अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे.
असे असेल कामकाजाचे वेळापत्रक -
६ जानेवारी - राष्ट्रवादीचे दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.
advertisement
८ जानेवारी - याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.
९ जानेवारी - फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, ९ तारखेनंतर ऎनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
११ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासली जातील
१२ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.
१४ जानेवारी - सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.
१६ जानेवारी - विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.
१८ जानेवारी - प्रतिज्ञापत्र सादर करणे.
२० जानेवारी - अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी
२३ जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी
२५ आणि २७ जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद.
