अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अपघात झाल्यानंतर कोमात गेलेल्या महाराष्ट्रातील साताऱ्याच्या नीलम शिंदे यांच्या कुटुंबाला अमेरिकन दूतावासाने उद्या २८ फेब्रुवारी रोजी व्हिसा मुलाखतीसाठी बोलावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी लवकर व्हिसा मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्याचे आश्वासन दिले आहे.
१० दिवसांपासून कोमात, कुटुंबाने केंद्र सरकारकडे मागितली मदत
३५ वर्षीय नीलम शिंदे या साताऱ्याच्या असून, कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीत चौथ्या वर्षाच्या शिक्षणासाठी गेल्या होत्या. १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी फिरायला गेलेल्या नीलम यांना एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या आणि कोमात गेल्या.
advertisement
हिट-अँड-रन असल्याचा संशय, गंभीर दुखापती
शिंदे कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, हा एक हिट-अँड-रन प्रकार असल्याचा संशय आहे. अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने नीलम यांच्या दोन्ही हात, पाय, डोके आणि छातीला गंभीर इजा झाली आहे.
कुटुंब अमेरिकेला जाणार
नीलम शिंदे यांच्या वडिलांनी केंद्र सरकारकडे अमेरिकेचा तातडीचा व्हिसा मिळवून देण्याची विनंती केली होती. सरकारच्या हस्तक्षेपानंतर आता त्यांच्या कुटुंबाला मुंबईतील अमेरिकन दूतावासात मुलाखतीसाठी बोलावले आहे.
