शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले? असे आव्हान देत निलेश लंके यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. मागील अनेक वर्षांपासून नगर–मनमाड महामार्गाचे काम रखडलेले आहे. या काळात अनेक ठेकेदारांनी काम अर्धवट सोडले. मात्र याबाबत पालकमंत्र्यांकडून ठोस उत्तर मिळत नसल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे.
नगर–मनमाड महामार्गाचं काम माझ्याच कार्यकाळात पूर्ण होईल
advertisement
“मी खासदार झाल्यानंतर पुन्हा टेंडर काढून काम सुरू केले. त्यात त्रुटी होत्या म्हणून तेही काम अर्धवट राहिले. त्यानंतर पुन्हा टेंडर काढले आणि आता काम सुरू आहे. हे काम माझ्याच काळात पूर्ण होईल”, असे सांगत लंके यांनी थेट सवाल उपस्थित केले.
साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा, पैसे कुणी मागितले?
तसेच नितीन गडकरी यांनी नगरच्या राजकीय नेत्यांबाबत माझ्यासमोर काय बोललं आहे, ते मी बोललो तर तुम्हाला अवघड होईल, मागील सात–आठ वर्षांत अनेक ठेकेदारांनी काम अर्धवट सोडले. ते का गेले? कुणाला वैतागून गेले? कुणी काय मागणी केली? हे समाजासमोर आणा. तुम्ही शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा– पैसे कुणी मागितले. मी खासदार झाल्यानंतर रस्त्याचे काम सुरू केले आहे आणि ते माझ्याच काळात पूर्ण होणार. तुम्ही एवढे कार्यशील होता, तर तुमच्या काळात हा रस्ता मंजूर का झाला नाही? असा सवाल निलेश लंके यांनी पालकमंत्री विखे यांना विचारला.
