TRENDING:

Nitin Gadkari : भाजपमध्ये इनकमिंग सुस्साट, गडकरींच्या मनातली खदखद समोर? ''बाहरेच्यांना सावजी चिकन, अन्...''

Last Updated:

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गडकरी यांच्या भाषणावेळी भाजपचे नेते, पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर: 'शत प्रतिशत भाजप' ही घोषणा पूर्ण करण्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाले आहे. इतर पक्षातील नेत्यांना, पदाधिकार्‍यांना स्थान दिले जात आहे. भाजपमधील याच इनकमिंगवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गडकरी यांच्या भाषणावेळी भाजपचे नेते, पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
भाजप नेत्यांसमोरच गडकरींची खदखद बाहेर आली, ''ज्या वेगाने पक्ष वर गेला, त्या वेगाने...
भाजप नेत्यांसमोरच गडकरींची खदखद बाहेर आली, ''ज्या वेगाने पक्ष वर गेला, त्या वेगाने...
advertisement

कळमेश्वर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या तसेच वन टाइम इम्प्रूव्हमेंट अंतर्गत कळमेश्वरमधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणेच्या प्रकल्पांची पायाभरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या आतल्या संघटनात्मक पद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली. पक्षामध्ये जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असून बाहेरून येणाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा मुद्दा त्यांनी स्पष्टपणे मांडला. “घर की मुर्गी दाल बराबर, पण बाहेरच्यांना सावजी चिकन,” अशी उपमा देत त्यांनी पक्षाच्या सध्याच्या कार्यप्रणालीवर चिमटा काढला.

advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “कळमेश्वर भागात डॉ. राजीव पोतदार हे पक्षाचे निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्ते असूनही त्यांच्या न्यायाकडे दुर्लक्ष होत आहे. आज पक्षात घरची माणसे मागे पडत आहेत, तर बाहेरून आलेल्यांना अधिक महत्त्व मिळत आहे. सावजी चिकन जसे चविष्ट वाटते, तसे बाहेरचे आकर्षक वाटत असले तरी पक्षाची खरी ताकद ही जुन्या कार्यकर्त्यांमध्येच असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

advertisement

तर पक्ष वेगाने खाली येईल...

गडकरी यांनी पुढे म्हटले की, “मी सध्या थेट संघटनात्मक जबाबदारीत नाही. पण एका गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की, जर जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारत राहिलो, तर पक्ष ज्या वेगाने वर जात आहे, त्याच वेगाने खाली येईल, हेही वास्तव असल्याचे गडकरींनी स्पष्टच सांगितले.

भाजप नेत्यांसमोर गडकरींनी सुनावलं..

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल आणि आमदार आशीष देशमुख यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. मंचावरच्या या स्पष्ट वक्तव्याने पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असल्याची चर्चा आहे. गडकरींच्या या टिप्पणीमुळे पक्ष नेतृत्वासमोरील संघटनात्मक प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nitin Gadkari : भाजपमध्ये इनकमिंग सुस्साट, गडकरींच्या मनातली खदखद समोर? ''बाहरेच्यांना सावजी चिकन, अन्...''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल