नागपूरमधील ‘सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “पूर्वी कंत्राट मिळवण्यासाठी तांत्रिक व आर्थिक पात्रतेपेक्षा कोण काळा कोट घालून येतो, हे महत्त्वाचं असायचं. एवढंच ठरवायचं बाकी होतं की त्यालाच कंत्राट द्यायचं, अशी पद्धत होती.
गडकरी यांनी अशा प्रकारच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जे कंत्राटदार दर्जेदार काम करत नाहीत, अपारदर्शक पद्धती वापरतात किंवा टोल वसुलीत गैरप्रकार करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. “कंत्राटदार आणि टोल वाल्यांना तुरुंगात टाकणार आणि त्यांचे फोटो काढणार,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
advertisement
कार्यक्रमात पुढे बोलताना गडकरींनी ब्रम्हपुत्रा नदीखालील महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्पाची माहितीही दिली. "12 हजार कोटींच्या खर्चाने ब्रम्हपुत्रा नदीखालून टनेल उभारला जाणार आहे. खर्च कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात मी सातत्याने तांत्रिक आणि आर्थिक अभ्यास केला," असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे, पण त्या कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त निर्णयप्रक्रिया आणि वेग यांचा समतोल राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले.