TRENDING:

Navaratri 2025 : यंदाची नवरात्री असणार खास, नऊ नव्हे दहा दिवसांचा उत्सव; पण कारण काय?

Last Updated:

गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. तब्बल 27 वर्षांनी नवरात्रोत्सव नऊ ऐवजी दहा दिवसांचा असणार आहे, तृतीय तिथीची यंदा वृद्धी आल्यामुळे हा शारदीय नवरात्रोत्सव नऊ नव्हे तर दहा दिवस असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. तब्बल 27 वर्षांनी नवरात्रोत्सव नऊ ऐवजी दहा दिवसांचा असणार आहे, तृतीय तिथीची यंदा वृद्धी आल्यामुळे हा शारदीय नवरात्रोत्सव नऊ नव्हे तर दहा दिवस असणार आहे. तसेच या नवरात्री उत्साहात देवीची पूजा कोणत्या महत्वांच्या दिवसात करावी या बद्दलची माहिती नाशिक येथील पुजारी समीर जोशी यांनी लोकल 18 च्या माध्यमातून दिली आहे.
advertisement

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोत महिलाराज! 100 पायलट्सची होणार भरती

आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारी 22 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. शारदीय नवरात्र साधारण नऊ दिवसांचा उत्सव असतो. मात्र यंदा तिथीचा क्षय अथवा वृद्धी असल्यामुळे हा उत्सव आठ किंवा दहा दिवसांचाही होऊ शकतो, यंदा असेच झाले आहे.

या वर्षीच्या शारदीय नवरात्रीत तृतीया विधीची वृद्धी आल्यामुळे दहा दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. वर्षभरात चार प्रकारचे नवरात्र येतात. त्यापैकी अश्विन  महिन्यातील शारदीय नवरात्राला विशेष महत्व आहे. या काळात देवीची आराधना, उपवास आणि विविध धार्मिक निधी केले जातात. उपवास नऊ दिवस पाळणे शक्य नसल्यास पहिल्या किया शेवटच्या दिवशी उपवास केला तरी धार्मिक मान्यता असल्याने धर्म अभ्यासक सांगतात.

advertisement

नोकरी सोडली, मधमाशी पालनाचा सुरू केला व्यवसाय, तरुणाची वर्षाला 15 लाखांची उलाढाल

तसेच यंदाच्या नवरात्रोत्सवाची सुरवात ही 22 सप्टेंबर पासून होत आहे तर यंदा देवीचा घटस्थापना दिवस सोमवारी असल्याने देवीचे वाहन हे हत्ती असणार आहे. आणि हत्ती हे वाहन लक्ष्मीचे प्रिय असल्याने यंदाची नवरात्री विशेष असणार आहे.यंदाचा शारदीय उत्सव हा 10 दिवसांचा असल्याने कुणाचे कुळाचार हे नऊमी पर्यंतचे असतात त्यांनी १ ऑक्टोंबर रोजी विधीवत पूजा करावी. तसेच ज्यांचे कुळाचा हे दशमीचे असतात त्यानी 2 ऑक्टोबरला पूजन करावे. 

advertisement

नवरात्रीतील दिनविशेष

26 सप्टेंबर : ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन

29 सप्टेंबर: दुर्गाष्टमी

30 सप्टेंबर:महाष्टमी उपवास

02 ऑक्टोबर : विजयदशमी

अशा पद्धतीने यंदाच्या नवरात्री उत्वाची सुरवात आणि सांगता होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navaratri 2025 : यंदाची नवरात्री असणार खास, नऊ नव्हे दहा दिवसांचा उत्सव; पण कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल