TRENDING:

Sagar Moholkar: गँगवॉर की कौटुंबीक वाद? सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट, दोन दिवसांपूर्वी बापानेच...

Last Updated:

Sagar Mohalkar News Update: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारी रात्री कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारी रात्री कुख्यात गुंड म्हणून ओळख असलेल्या पैलवान सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. त्याच्यावर पाच ते सहा राऊंड फायरींग करण्यात आली आहे. या गोळीबारात सागर मोहोळकर गंभीर जखमी झाला आहे. तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

रात्री उशीरा गोळीबाराचा थरार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जामखेड परिसरात रात्रीच्या सुमारास सागर मोहळकर याच्यावर अज्ञातांनी दबा धरून गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत परिसराची नाकाबंदी केली आहे. सध्या सागर मोहळकरची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती समोर येत असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

advertisement

निलेश घायवाळ कनेक्शन आणि जुना वाद

सागर मोहळकर हे नाव गेल्या काही काळापासून गुन्हेगारी जगतात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं. या चर्चेमागचे मुख्य कारण म्हणजे, त्याने पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवाळ याच्या कानशिलात लगावली होती. या धाडसी कृत्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती आणि तेव्हापासूनच मोहळकर अनेकांच्या निशाण्यावर होता. त्यामुळे त्याच्यावरील गोळीबार गँगवॉरमधूनच करण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. यात स्थानिक गुन्हेगारी किंवा घायवळ टोळीचा हात असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

advertisement

सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट

दरम्यान, या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. याला कौटुंबीक वादाची किनार देखील जोडली जात आहे. कारण अवघ्या दोन दिवसांपूर्वीच सागर मोहळकरच्या वडिलांनी त्याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, अशीही माहिती समोर आली आहे. हा अदखलपात्र गुन्हा होता. सागर मोहोळकर आपल्याला मारहाण करतो, अशी तक्रार वडिलांनी दिली होती. यानंतर बुधवारी सागरवर बेछूट गोळीबार झाला आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांचं एकमेकांशी काही कनेक्शन आहे का? याबाबत देखील विविध तर्क मांडले जात आहेत.

advertisement

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

सध्याच्या घडली सागर मोहोळकर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत. शिवाय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तपास केला जात आहे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानाखाली मारलेल्या सागर मोहोळकरवर अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sagar Moholkar: गँगवॉर की कौटुंबीक वाद? सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट, दोन दिवसांपूर्वी बापानेच...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल