याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक 74 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती आपली 65 वर्षांची पत्नी आणि 40 वर्षांच्या दिव्यांग मुलासोबत मानपाडा येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासमवेत टिटवाळा येथे राहत होता. एप्रिल 2025मध्ये तो पत्नीसह वाघबीळ येथे राहण्यास आला. त्याचे आणि त्याची पत्नीचे सतत वाद होत होते. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी जुलै 2025मध्ये त्याला सोडून माहेरी निघून गेली.
advertisement
त्यानंतर हा मुलगा वडिलांच्या मालकीच्या मानपाडा येथील घरात राहण्यासाठी आला होता. घरात राहण्यासाठी आल्यानंतर त्याने अरेरावी करण्यास सुरुवात केली. तुम्ही घरामध्ये राहायचे नाही, मला हे घर विकायचं आहे त्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर निघा, असं म्हणून तो आई-वडिलांना शिवीगाळ करत असे. तसेच तुमच्यामुळे माझी बायको माहेरी गेली, असं बोलून तो आई-वडिलांना मारहाण देखील करत होता.
एक दिवस गावी असलेली जमीन आणि वडिलांच्या नावे असलेलं घर विकण्यासाठी त्याने आई-वडिलांना मारहाण करत घरातून बाहेर काढलं. पोटच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी मुलाविरोधात कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.