महाराष्ट्रातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. या परिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्री विविध जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करुन पूरग्रस्तांना दिलासा देत आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.
advertisement
या परिस्थितीचे भान राखून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव आणि सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.