बैलगाडा शर्यतीत घडलेल्या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे. मैदानावर सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ या गावातील अंबाजी शेखु चव्हाण हे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेले होते. अंबाजी चव्हाण हे चहा पीत बाजूला उभे असताना आदत गटातील दोन ते चार बैलगाड्या उधळून मैदानातून बाहेर पडल्या, यामध्ये अंबाजी चव्हाण यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.
advertisement
तर या शर्यतीमध्ये वेगवेगळा अपघातांमध्ये 13 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती समजते. जखमी झालेले सर्वजण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. तर यातील नयुम आयुब पठाण असे एका जखमीचे नाव समोर येत आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
November 10, 2025 8:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli News: Thar, फॉर्च्युनर जिंकणाऱ्या बैलगाडा शर्यतीत घडली वाईट घटना, 12 तासांनंतर माहिती समोर
