TRENDING:

Heramb Kulkarni : दोघांनी लोखंडी रोडने..; समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लाचा CCTV Video समोर

Last Updated:

Heramb Kulkarni : अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ हेरंब कुलकर्णी यांची गाडी तीन तरुणांनी अडवली. त्या तरुणांनी कुलकर्णींना लोखंडी रॉडने मारहाण केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, 09 ऑक्टोबर : समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगरमधील रासने नगर इथं प्राणघातक हल्ला झाला होता. तिघांनी गाडीवर येत हेरंब कुलकर्णी यांच्या दुचाकीला आडवी मारली. त्यानंतर काही कळण्याच्या आता सोबत आणलेल्या हत्यारांनी कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. हेरंब कुलकर्णी हे शाळेतून परत येत असताना हा हल्ला झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.
समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लाचा CCTV Video समोर
समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लाचा CCTV Video समोर
advertisement

याबाबत प्रतिमा कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं की, शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवरून ते परत येत होते. तेव्हा अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवली. त्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली.

advertisement

गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर, दोन्ही हातावर, पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. यामुळे डोक्याला ४ टाके पडले आहेत. तर डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला. यामुळे हेरंब कुलकर्णी थोडक्यात बचावले. अन्यथा त्यांच्या डोक्याला जबर मार बसला असता. या मारहाणीवेळी ते रस्त्यावर पडले. सध्या हेरंब कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर असून ते विश्रांती घेत असल्याचं पत्नी प्रतिमा यांनी सांगितलं.

advertisement

वाचा - हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला, पत्नीने सांगितला संपूर्ण घटनाक्रम; नेमकं काय झालं?

हेरंब कुलकर्णी यांनी सिव्हील हॉस्पिटलला उपचार घेतले आणि तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तास झाले तरी पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नसल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी यांची पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी केला. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे असल्याच्या भावना त्यानी व्यक्त केल्या.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/उस्मानाबाद/
Heramb Kulkarni : दोघांनी लोखंडी रोडने..; समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लाचा CCTV Video समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल