पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमरगा तालुक्यातल्या एका गावातील तरुणी ही धाराशिवमध्ये नर्सिंगच शिक्षण घेत होती. याचदरम्यान पुणे येथील हिरालाल इंगळे या तरुणाने तिच्याशी इंस्टाग्रामवर मैत्री केली, फोन मेसेजच्या माध्यमातून त्याने तिच्याशी संपर्क वाढवला. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले.
लग्नाचं आमिष
हिरालाल पीडित तरुणीला भेटण्यासाठी धाराशिवला आला. त्याने या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर तो तिला फिरण्यासाठी पुण्याला घेऊन गेला. प्रेमाच्या आणाभाका घेत संबंधीत तरुणीचा त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तेथील एका लॉजवर तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर तो तिच्यासोबत एका अपारमेंटमध्ये भाड्यानं फ्लॅट घेऊन देखील राहिला.
advertisement
गुन्हा दाखल
त्यानंतर मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपीने तुझे वय कमी आहे, असं सांगत पीडित तरुणीला गर्भपात करायला लावला. तरुणीनं गर्भपात करताच आरोपीनं तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणात आता पीडित तरुणीच्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपी प्रियकर, आई-वडील आणि त्याच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.