प्रशांत सोनवणे यांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात पदवी मिळवली आणि एका नामांकित हॉटेलमध्ये चांगल्या पगारावर आपल्या करिअरची सुरुवात केली. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, अचानक त्यांना नोकरी सोडावी लागली. या अनपेक्षित घटनेमुळे ते खोल नैराश्यात (डिप्रेशन) गेले होते. नोकरी गमावल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आणि घरखर्च कसा चालवायचा, या विचारांनी प्रशांत दिवसरात्र तणावात राहत होते. "आता काय करायचे?" हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता.
advertisement
या कठीण काळात त्यांचे मामा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रशांत सांगतात, "मामांनीच मला या निराशेमधून बाहेर काढले. त्यांनीच मला व्यवसायाची कल्पना सुचवली आणि आज त्यांच्यामुळेच मी माझा व्यवसाय इथपर्यंत आणू शकलो." मामांच्या प्रोत्साहनाने आणि स्वतःच्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर प्रशांत यांनी पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला.आज हा तरुण आपल्या व्यवसायातून दर महिन्याला ६० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे.
आजही त्यांचे मामा त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत आणि दोघे मिळून 'श्री स्वामी समर्थ पाणीपुरी सेंटर' यशस्वीरित्या चालवत आहेत. प्रशांत सोनवणे यांची ही कहाणी तरुण पिढीसाठी एक प्रेरणा आहे. संकटे कितीही मोठी असली तरी, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाने त्यावर मात करून जीवनात यशस्वी होता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.