TRENDING:

मोठी बातमी! शहीद जगदाळेंच्या लेकीच्या नोकरीसाठी थेट मुख्यमंत्री मैदानात, तरीही कुटुंबाचे समाधान होईना, कारण काय?

Last Updated:

. शहीद संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला तातडीने नोकरी मिळावी यासाठी मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत असल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई  : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी सरकारच्या वेगवान हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. शहीद संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला तातडीने नोकरी देण्यासाठी विविध पर्यायांवर विचार करण्यात आला असून  या प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत असल्याचे समोर आले आहे.
News18
News18
advertisement

पहलगाम हल्ल्यानंतर आसावरी जगदाळे यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या. मात्र, शासकीय प्रक्रियेमुळे विलंब होऊ नये, यासाठी सुरुवातीला एका नामांकित खाजगी विद्यापीठात नोकरी देण्याचा पर्याय पुढे ठेवण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः संबंधित विद्यापीठाशी बोलून हा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, जगदाळे कुटुंबीयांनी हा पर्याय नम्रपणे नाकारला. त्यांची इच्छा शासकीय सेवेतच नोकरी मिळावी, अशी ठाम भूमिका असल्याचे सांगण्यात आले.

advertisement

पुणे महापालिकेत नोकरी मिळावी, कुटुंबियांची इच्छा

यानंतर पीएमआरडीएमध्ये (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) नोकरीचा प्रस्ताव आसावरी जगदाळे यांना देण्यात आला. मात्र, त्यांची आणि कुटुंबीयांची मुख्य इच्छा पुणे महापालिकेत नोकरी मिळावी, अशी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने आपल्या स्तरावर वर्ग-३ किंवा वर्ग-४ संवर्गातील नोकरी देण्याची तयारी दर्शवली. तथापि, शहीद जवानाच्या कुटुंबासाठी विशेष बाब म्हणून वर्ग-२ अधिकारीपदाची नियुक्ती देण्यात यावी, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर सध्या शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून, लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

advertisement

संपूर्ण राज्याचे लक्ष

यापूर्वी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या मुलीला, अनुष्का मोरे यांना अनुकंपा तत्त्वावर थेट नियुक्ती देण्यात आली होती. त्या उदाहरणाचा आधार घेत आसावरी जगदाळे यांनाही तत्काळ आणि सन्मानजनक पदावर नोकरी मिळावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना न्याय देणे ही केवळ सामाजिकच नव्हे, तर नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले जात असून  सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकर आजही पितात ब्रिटिशांनी उभारलेल्या वाड्यातून दूध, आजही आहे 1500 गायी-म्हशी
सर्व पहा

BMC च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! नाराजी थोपवण्यासाठी किशोरी पेडणेकरांचा 'बळी'?, ठाकरेंच्या शिवसेनेत चाललंय काय?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! शहीद जगदाळेंच्या लेकीच्या नोकरीसाठी थेट मुख्यमंत्री मैदानात, तरीही कुटुंबाचे समाधान होईना, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल