हल्ल्यानंतर राकेशचा जागीच मृत्यू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकाच कंपनीत काम करणाऱ्या या दोन तरुणांमध्ये कामाच्या ठिकाणी कोणत्या तरी कारणावरून जोरदार भांडण झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात आसारामने लोहेच्या रॉडने राकेशवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर राकेशचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा हा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आसारामने मृतदेह कंपनीच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकला आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
advertisement
कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना काहीतरी संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढला आणि तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कलम 103 नुसार गुन्हा दाखल
पालघर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणावर अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने हालचाली करून आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिताच्या कलम 103 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे." हा वाद नेमका कशामुळे झाला आणि यात कोणाचे चिथावणीखोर वागणे होते का, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
