आखला आहे. या प्लॅनला मंत्रिमंडळाकडून मंजुरी देखील मिळाली आहे.
नाशिक आणि पालघर या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील प्रवासाचे अंतर आता कमी होणार असून, वाहतूक कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय महामार्ग-१६० ए (NH-160A) च्या पुनर्वसन आणि चौपदरीकरणाच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. १५४ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकार ३,३२०.३८ कोटी रुपये खर्च करणार आहे.
advertisement
नाशिक शहराची वाहतूक कोंडी फुटणार
नाशिकमधील अंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतींमधील मालवाहतुकीचा सध्या नाशिक शहरावर मोठा ताण येतो. मात्र, नवीन प्रकल्पामुळे घोटी–त्र्यंबक–मोखाडा–जव्हार–मानोर–पालघर हा मार्ग चौपदरी झाल्यामुळे जड वाहनांना शहराबाहेरून एक सक्षम पर्यायी मार्ग मिळेल. यामुळे मुंबई आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक समृद्धी महामार्गावरून थेट त्र्यंबक आणि नाशिककडे जलद गतीने पोहोचू शकेल.
फायदा कुणाला आणि काय होणार?
चौपदरीकरणामुळे नाशिक ते पालघर हे अंतर कमी वेळेत पार करता येईल. तारापूर, बोईसर सेझ (SEZ) आणि वाडा येथील औद्योगिक वसाहतींना हा महामार्ग थेट जोडला जाणार आहे. त्र्यंबकेश्वर, जव्हारचा राजवाडा, वैतरणा नदी आणि अर्नाळा किल्ला यांसारख्या पर्यटन स्थळांना भेट देणे पर्यटकांसाठी सोपे होईल.
पालघर आणि मोखाडा या आदिवासी बहुल क्षेत्रातील रस्ते सुधारल्यामुळे तिथे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात सुमारे ४४ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे.
२०२८ पर्यंतचं लक्ष्य
२०२८ पर्यंत या मार्गावर दररोज १०,००० पेक्षा जास्त वाहने धावतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा महामार्ग पुढे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि आगामी वाढवण बंदराशी जोडला जाणार असल्याने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे.
