अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने पाहत असतानाच हा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 7 फेब्रुवारी रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. मात्र, वरळीमध्ये डॉ गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून गर्जे दाम्पत्यांमध्ये वाद, भांडण सुरू होती. यातून डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गौरीच्या कुटुंबीयांनी तिचा पती अनंत याच्याशिवाय, त्याचा भाऊ, बहीण यांचीही तक्रार दाखल केली होती.
advertisement
मध्यरात्री अटक...
डॉ. गौरी पालवे-गर्जेच्या आत्महत्या प्रकरणी वरळी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला होता. पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अटक केली. भारतीय न्याय संहिता कलम 108,85,352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, अनंत गर्जे याची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत गर्जेची पोलिसांसमोर शरणागती...
कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य रितीने पार पडावी,यासाठी अनंत गर्जे पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पोलिसांसमोर स्वत: सरेंडर झाल्याची माहिती समोर आली आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनसमोर यावे, यासाठी तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला अनंत गर्जे तयार असून त्यासाठीच शरणागती स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
वडिलांना गौरीने पाठवला होता अनंतच्या कारनाम्याचा पुरावा...
डॉक्टर असलेल्या गौरीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी गौरीने आपल्या वडिलांना अनंत गर्जेविरोधातला पुरावा पाठवला होता. गौरीसमोर तो पुरावा समोर आल्यानंतर आभाळ कोसळलं होतं. मात्र, त्यानंतरही तिने संयमी भूमिका घेतली होती, अशी माहिती समोर येऊ लागली आहे. पोलिसांनी कुटुंबीयांना दिलेल्या तक्रारीनुसार, गौरीने ३० सप्टेंबर रोजी हिने वडिलांना व्हॉट्स अॅप काही फोटो पाठवले होते. हे फोटो पाहून घरातील मंडळीही पोरीच्या संसारासाठी चिंताग्रस्त झाले.
गौरीने पाठवलेल्या हॉस्पिटलमध्ये लातूरमधील एका रुग्णालयाचे काही कागदपत्रे असल्याचे दिसून आले. 16/11/2021 रोजीचे ममता हॉस्पिटल, लातूर येथील गर्भवती स्वीचे संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचे दिसल्याचे त्यात दिसून आले. यामध्ये किरण असे महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव अनंत भगवान गर्जे असे नमुद करण्यात आले होते. पती अनंतबद्दल ही बाब कळल्यानंतर दोघांमध्ये वाद, भांडण सुरू झाले होते. गौरीला तिच्या सासरी मारहाणही होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. तर, गौरीच्या नणंदने तिला अनंतचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी दिली होती.
