चर्चेत असलेल्या मुंढवा जमीन घोटाळ्यात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा थेट सहभाग असल्याचे नवे तपशील समोर आले आहेत. येवले यांनी या वादग्रस्त जमिनीबाबत सरकारी संस्थांना अधिकृत पत्रे पाठवून ती जमीन ‘मुळ वतनदारांना परत देण्याचा’ उल्लेख केला होता. मात्र, हीच जमीन नंतर पार्थ पवार यांच्या ‘अमेडीया’ कंपनीकडे देण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
advertisement
तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र लिहिले होते. मुंढवा मधील जागा महार वतनदांरा़ची आहे आणि ते भोगवटा भरण्यास तयार असल्याने त्यांना ती जागा परत देण्यात येत आहे असे पत्रात नमूद करण्यात आले होते. या जमिनीच्या व्यवहारासाठी येवले यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपासून त्यांचा पत्र व्यवहार सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे.
कधी-कधी झाला पत्र व्यवहार?
निलंबित तहसीलदार सुर्यकांत येवले याने सर्वात आधी ही जागा महार वतनदांरा़ची आहे आणि ते भोगवटा भरण्यास तयार असल्याने त्यांना ती जागा परत देण्यात येत आहे असे पत्र जून महिन्यात बॉटिनीकल सर्वे ऑफ इंडिया या स़ंस्थेला दिले. ही जागा तात्काळ रिकामी करण्यासही सांगितले.
त्यानंतर येवले यांनी जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरे पत्र लिहीले आणि ही जागा मुळ वतदनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले.
वतनदारांची पॉवर ऑफ एटर्नी शीतल तेजवानीकडे होती. या शीतल तेजवानीने ही जागा ३०० कोटींना अमेडीया कंपनीला विकली असल्याने ही जागा अमेडीया कंपनीला देण्याचे आदेश देण्यात आले.
आता हे पत्र समोर आल्याने तहसीलदार येवलेला हाताशी धरून ही जमीन बळकावण्याचे प्रयत्न अनेक महिन्यांपासुन सुरु होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
