TRENDING:

Parth Pawar Raj Thackeray: पार्थ पवारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, 'शिवतीर्थ'वर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

Last Updated:

Parth Pawar Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवगंत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवगंत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. जवळपास एक-दीड तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
: पार्थ पवारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, 'शिवतीर्थ'वर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
: पार्थ पवारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, 'शिवतीर्थ'वर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
advertisement

पार्थ पवार यांनी आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल दीड तास चाललेल्या या प्रदीर्घ भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले, ज्यामुळे या भेटीचा तपशील गुलदस्त्यातच आहे. तथापि, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, या मृत्यूभोवती असलेल्या संशयाच्या धुक्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चर्चा केली होती. रोहित पवार यांच्याकडून अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांचा अपघात धुक्यानं झाला की धोक्यानं झाला असा सवाल केला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेती करावी तर अशी, पारंपरिक पद्धतीला फाटा देत केली हुरडा ज्वारी लागवड, आता लाखांत कमाई
सर्व पहा

सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parth Pawar Raj Thackeray: पार्थ पवारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, 'शिवतीर्थ'वर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल