पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १७ मधून एक अनोखी आणि चर्चेची मागणी समोर आली आहे. शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार माधव पाटील यांनी निवडणूक खर्चासाठी कुणाकडून मदत मागितली नाही. थेट वर्ल्ड बँकेकडे ३० कोटींचं कर्ज मागणीचा अर्ज पाठवला आहे. त्यांच्या या पत्राची स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
माधव पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या प्रभागातील जवळपास ३० हजार महिलांना प्रत्येकी १०,००१ रुपये देऊन त्यांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांनी म्हटले की, “मला नोट देऊन वोट घ्यायचं नाही. तशी निवडून आलो तरी मला अभिमान वाटणार नाही. महिलांच्या हाताला रोजगार देणं आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं हा माझा खरा उद्देश आहे. त्यामुळे वर्ल्ड बँक मला नक्की कर्ज देईल, असा मला विश्वास आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
advertisement
त्यांच्या या दाव्याने शहरात हास्य-विनोदासोबतच गंभीर चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांची ही कृती ही फक्त निवडणूक गाजावाजा नसून महायुती सरकारला पुणेरी स्टाईलने टोला लगावण्याचा एक प्रयोग असल्याची चर्चा आहे. महागाई, बेरोजगारी आणि महिलांसाठीच्या योजनांवरून सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा आगळावेगळा मार्ग निवडल्याचे म्हटले जात आहे.
