प्रज्ञा सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा २०३० पर्यंतचा कार्यकाळ होता. मात्र, भाजप प्रवेशाआधीच त्या आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. डॉ. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. सातव यांच्या निर्णयामुळे हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
> काँग्रेस का सोडली? प्रज्ञा सातव यांनी म्हटलं...
advertisement
भाजपमधील प्रवेशानंतर डॉ. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करण्याबाबत भाष्य केलं. राजीव सातव हिंगोलीचे भूमिपुत्र होते त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी अविरत काम केलं. राजीव साहेबांच्या निधनानंतर मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली तेंव्हा लोक माझ्यासोबत उभे राहिले असल्याचं त्यांनी म्हटले.
माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, राजीव सातव यांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राचा चौफेर विकास घडत आहे त्यामध्ये आम्हाला साथ द्यायची असल्याने आम्ही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राजीवभाऊंचे आशीर्वाद, देवाभाऊंची साथ, सर्वजण संकटावर मात करू असे प्रज्ञा सातव यांनी म्हटले. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या परिवारात सामावून घेतले, यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देत असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपमधील प्रवेशाबाबत त्यांनी म्हटले की, राजीव सातव यांनी जे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्राचा जो विकास होत आहे त्यामध्ये देवाभाऊंना हातभार लावण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केलं.
> राजीव सातवांची आठवण...
डॉ. प्रज्ञा सातव यांनी म्हटले की दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमीपूत्र होते. त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव यांनीही हिंगोलीच्या विकासासाठी आजीवन काम केले होते. त्या दोघांसोबत राहून मी गेली 20 वर्षे एनजीओ, शिक्षणसंस्थांमध्ये काम करत होते. राजीव सातव यांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रज्ञा सातव या काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांना २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष होत्या. सातव कुटुंब हे काँग्रेसच्या विचारांचे घराणं समजलं जातं. मात्र, प्रज्ञा सातव या भाजपात प्रवेश केला.
