राष्ट्रवादी काँग्रसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कुणीही स्वत:ला बाहुबली समजू नका, असा नाव न घेता इशारा महायुतीतील सहकारी सत्ताधाऱ्यांना दिला. तर मतदारांवरही पटेलांनी मुक्ताफळं उधळली. निवडणुकीत जितकी गरजेची आहे, तितका पैसा खर्च करावाच लागतो, अशी बहुमूल्य माहितीही प्रफुल्ल पटेलांनी दिलं. तसेच लोक पैसे घेऊन दुसऱ्याला मतदान करतात, असेही ते म्हणाले.
advertisement
प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची टीका
प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याच्या सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला. मतदारांची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांवर तोफ डागली. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यात त्यांच्या मित्रपक्षांनाही चांगलंच सुनावलं. स्वत:ला बाहुबली समजणाऱ्यांना आम्ही निवडून दिलंय, याची आठवणी पटेल यांनी महायुतीतील मित्रपक्षांना करून दिली.
प्रफुल पटेल यांचा रोख कोणत्या पक्षाकडे, मुख्यमंत्री म्हणाले...
प्रफुल्ल पटेल यांनी बाहुबली शब्द तर वापरला, मात्र कुणाचंही नाव घेतलं नाही. पण त्यांचा इशारा महायुतीतील मित्रांवरच असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे पत्रकारांनी या मुद्यावरून थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांनी प्रफुल्ल पटेलांचा रोख कुणाकडे आहे, हे शोधण्याचं काम माध्यमांकडे देऊन टाकलं. त्यामुळे आता माध्यमांच्या शोधात कोणती नावं समोर येतात, हे आता लवकरच स्पष्ट होईल.
