रेखा सांगतात, प्राणिक हिलिंग हा एक ऊर्जा पूरक तसेच नैसर्गिक आणि वैद्यकीय सराव आहे. प्राण हा मूलतः संस्कृत शब्द आहे. प्रत्येक प्राण्याच्या शरीरात एक सुप्त जीवन ऊर्जा असते. एखाद्या व्याधीवर किंवा रोगांवर उपचार करण्यासाठी शरीरातील सुप्त जीवन ऊर्जा एका ठराविक पध्दतीने वापरल्यास गंभीर आजारांवर देखील मात करता येते. प्राणिक हिलिंग ही आयुर्वेदातील वैद्यकीय पद्धत आहे. प्राणिक उपचार हे अनेक गंभीर आजारांमध्ये खूप उपयुक्त आहेत.
advertisement
Brown Rice: डायबेटिक रुग्णांसाठी हा राईस ठरतो वरदान, फायदे ऐकाल तर आजच खरेदी कराल
प्राणिक हिलिंग म्हणजे काय ?
ही एक ऊर्जा उपचार पद्धती आहे. आपल्या शरीरामध्ये स्वतःला बरं करण्याची क्षमता आहे, या संकल्पनेवर ही उपचार पद्धती आधारित आहे. शरीराची उपचार क्षमता वाढवण्यासाठी प्राणाचा वापर केला जातो. ही पद्धत जगभरातील अनेक लोक वापरतात आणि ती अत्यंत प्रभावी असल्याचं आढळलं आहे.
प्राणिक हिलिंग कसे काम करते?
प्राणिक हिलिंग तुमच्या शरीरातील ऊर्जा क्षेत्राला (ऑरा) स्वच्छ आणि रिचार्ज करण्याचं काम करते. आपली उर्जा स्वच्छ पाण्याच्या प्रवाहासारखी असल्याची कल्पना केली जाते. जेव्हा पाणी स्वच्छ असते आणि मुक्तपणे वाहते तेव्हा ते त्याच्या सभोवतालच्या वनस्पती आणि प्राण्यांना पोषण देते. आयुष्यातील राग, दुःख किंवा तणाव यांसारख्या नकारात्मक भावना उर्जेच्या प्रवाहात बाधा आणतात. प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून या नकारात्मक गोष्टी स्वच्छ केल्या जातात.
प्राणिक हिलिंगच्या 3 पायऱ्या
प्रवाहात अडथळा किंवा स्थिरता असलेल्या कोणत्याही क्षेत्रांची तपासणी करा: हे तुमच्या ऊर्जा क्षेत्राला स्कॅन करण्यासारखंच आहे.
कोणतेही प्रदूषक किंवा विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रवाह स्वच्छ करा: हे पाऊल कोणतीही नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि तुमच्या ऊर्जा वाहिन्यांमधील अडथळे दूर करते.
ताजे, स्वच्छ पाणी वाहण्यास प्रोत्साहित करून प्रवाहाला पुनरुज्जीवित करा: हे पाऊल तुमच्या शरीरातील उर्जेला रिचार्ज करते. हे तुमच्या शरीराला ताजी, स्वच्छ ऊर्जा देण्यासारखं आहे. यातून चैतन्य वाढते.
अश्या पद्धतीने तुम्ही रेखा यांच्याकडून आपल्या आजारांवर मात करण्यासाठी मदत घेऊ शकता. त्याचं प्राणिक हिलिंग सेंटर नाशिकमध्ये सुरुषा रेसिडेन्सी, मातोश्री नगर, तिडके कॉलनी, एसएसके हॉटेल समोर, एचडीएफसी बँकच्या पाठीमागे आहे. _ healyour_self_ या नावाने त्यांचं इन्स्टाग्राम पेज देखील आहे.