पण याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट परिसरातील धीरज लॉज परिसरात दोन लोक काही तरुणींचे फोटो दाखवून ग्राहक शोध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं. या पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून माहितीची शाहनिशा केली.
advertisement
संबंधित लॉजमध्ये अशाप्रकारे सेक्स रॅकेट सुरू असल्याचं खात्री पटताच पोलिसांनी तातडीने धीरज लॉजवर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी दोन दलालांसह पाच तरुणींना रंगेहाथ पकडलं. छापेमारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून तरुणींची सुटका केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. लोक वस्ती असलेल्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी अशाप्रकारे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
