TRENDING:

पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार रद्द,अजित पवार स्वत: पुढे आले अन् सगळं क्लिअर केलं

Last Updated:

विरोधकांनी आम्हाला टार्गेट करण्याचं काम केलं, पण यात एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यात पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार रद्द करण्यात आला आहे. या व्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आल्याची माहिती स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती दिली आहे. मुंबईत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जमीन व्यवहारात एकही रुपया दिलेला नसल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे.
News18
News18
advertisement

अजित पवार म्हणाले, मला या व्यवहाराची माहिती नव्हती. शेवटी आरोप करणे सोपे आहे. पण परिस्थिती काय आहे हे जनतेला कळलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की या व्यवहारामध्ये एकही रुपयाही दिला नाही. मोठ मोठे आकडे सांगितले गेले. विरोधकांनी आम्हाला टार्गेट करण्याचं काम केलं.पण यात एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही. जो काही व्यवहार केला होता तो रद्द करण्यात आला आहे.

advertisement

व्यवहाराच्या चौकशीसाठी समितीची स्थापना: अजित पवार

राज्याचे अॅडिशनल चिफ सचिव, आयुक्त आणि इतर मान्यवरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त नागपूर, मुद्रांक शुल्क विभाग यांच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करून एक महिन्याच्या आता हा अहवाल सादर करण्याचं सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवारांचं फडणवीसांशी काय बोलणं झालं? 

advertisement

आता हा व्यवहार आम्ही पाहिला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं नाही. ते नागपूरला आहे. त्यावेळी फोनवर संवाद साधला. मी त्यांना सांगितला, माझ्या घरातील जवळचा माणूस असला तरी नियमाप्रमाणे चौकशी करा, समिती स्थापन करायची असेल तर करावी. मला त्या गोष्टीला पाठिंबा राहिल, असेही अजित पवार म्हणाले.

मला व्यवहाराची माहिती नाही: अजित पवार

advertisement

अजित पवार पुढे म्हणाले, माझ्या ३५ वर्षांच्या काळामध्ये नियम सोडून कधी काम केलं नाही. माझ्यावर जल सिंचन प्रकरणात आरोप झाले. त्याच श्वेतपत्रिकाही काढली होती. पण हाती काही आलं नाही. या प्रकरणाची अजिबात मला माहिती नव्हती. जर मला माहित असतं तर मी लगेच सांगितलं असतं. कुठलाही व्यवहार केला, तर मी सांगत असतो, सगळी माहिती घेऊनच व्यवहार करा. नियमाने व्यवहार करा.

advertisement

कुणाचे फोन आले याची चौकशी होणार : अजित पवार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

नियमाप्रमाणे चौकशी करा, असं काम मला चालत नाही. आज माझ्या प्रत्येक ऑफिसच्या अधिकाऱ्यांना त्यांनाही विचारलं, कुणाला फोन करून दबाव आणला का, अशी विचारणा केली. पण कुणीही असा दबाव आणला नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार रद्द,अजित पवार स्वत: पुढे आले अन् सगळं क्लिअर केलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल