मॅगी पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य : 2 मॅगी पॅकेट, 1 मॅगी मसाला, 1 वाटी डाळीचं पीठ (बेसन), अर्धी वाटी रवा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, ओवा, जिरे, मीठ, हळद, गरम मसाला, तळण्यासाठी तेल इत्यादी.
Health Tips: सावधान! तुम्ही बुलेट कॉफी तर पित नाही ना? असे होतात गंभीर परिणाम
advertisement
मॅगी पकोडे बनवण्याची कृती : एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मॅगी मसाला व मॅगी टाकून अर्धवट शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर नूडल्स हलक्या हाताने मॅश करून बाजूला ठेवावेत. त्यानंतर त्यात बेसन, रवा, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, ओवा, मीठ, हळद, कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे. हे सर्व घटक चांगले एकजीव करून घ्या.
यात पाणी टाकण्याची गरज नाही. मॅगीच्या ओलाव्याने मिश्रण व्यवस्थित एकत्र होते. त्यानंतर पकोडे तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे आहे. त्यात हळूहळू तयार मिश्रणाचा एक एक गोळा सोडायचा आहे. सोनेरी रंग येईपर्यंत हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. काही मिनिटांतच अगदी कुरकुरीत पकोडे तयार होतील.
हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम मॅगी पकोडे सर्व्ह करू शकता. याठिकाणी दिलेलं साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. याप्रमाणे बनवलेले पकोडे अगदी कुरकुरीत होतात. हिरव्या चटणीसोबत अतिशय टेस्टी लागतात. चहा, कुरकुरीत पकोडे आणि चटणी हा बेत तुम्ही नक्की ठरवा.