पक्के मित्र राजकीय वैरी, मोहिते पाटील आणि सातपुते यांच्यातील वाद नेमका काय?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतोच आरोप प्रत्यारोपांचा शिमगा सुरू झाला आहे.
सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात कधीकाळी मित्र राहिलेले मोहिते पाटील आणि राम सातपुते हे आता जानी दुष्मन बनलेत. माजी आमदार राम सातपुतेंनी मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला धक्का दिल्यानंतर ही दुष्मनी आणखीनंच टोकाला पोहोचलीय. आरोप आहे की मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना जीवे मारण्याचा कट रचला. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या या दाव्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतोच आरोप प्रत्यारोपांचा शिमगा सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं पर्यायानं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राम सातपुतेंनी मोठा विजय मिळवला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर आरोपांच्या फैरी डागल्या आहेत. जयकुमार गोरेंनी केलेल्या आरोपांना माजी आमदार राम सातपुते यांनीही दुजोरा दिला.
advertisement
पोलिसांकडून चौकशी सुरू
अशातच भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केला आहे. जयकुमार गोरेंनी केलेल्या आरोपांना माजी आमदार राम सातपुते यांनीही दुजोरा दिला. या प्रकारामागे धैर्यशील मोहिते पाटील असल्याचा आरोप राम सातपुतेंनी केला आहे. जयकुमार गोरे आणि राम सातपुतेंनी केलेल्या या आरोपांनंतर या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
advertisement
आरोप प्रत्यारोपामुळं सोलापूरच राजकारण
राम सातपुतेंनी केलेले हे आरोप धैर्यशील मोहिते पाटलांनी फेटाळून लावले आहेत राम सातपुतेंना पराभूत करणारे माढा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनीही या आरोपांची खिल्ली उडवली आहे. बासोलापुरातील माळशिरस तालुका हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ल ओळखला जातो. मोहिते पाटलांचं वर्चस्व या भागात राहिलंय...मात्र गेल्या काही वर्षांपासून भाजपनं या वर्चस्वाला मोठा हादरे दिले आहेत .आता यातूनच आरोप प्रत्यारोपामुळं सोलापूरच राजकारण तापलंय.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 8:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पक्के मित्र राजकीय वैरी, मोहिते पाटील आणि सातपुते यांच्यातील वाद नेमका काय?






