कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणी कर्जमाफी मागायची या वक्तव्यामुळे विखे पाटील अडचणीत आले आहेत. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं विखे पाटील यांनी म्हटले आहे. निवडणुका आल्या कि सोसायटीचं कर्ज काढलं जातं त्यातून कोणतीही उत्पादकता होत नाही त्यामुळे कर्जबाजारी होऊन कर्जमाफी मागायची असं चक्र सुरू असल्याची सारवासारव करत विरोधकांना कवळ कर्जबाजारीपणा हा मुद्दा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून मी सार्वजनिक जीवनात काम करतोय मात्र मी कधीही बेताल वक्तव्य करत नसल्याचंही विखे पाटील यांनी म्हटले आहे.
advertisement
काय म्हणाले विखे पाटील?
एखाद्या वक्तव्याचा किती विपर्यास व्हावा याच आश्चर्य वाटतं... ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या ज्या निवडणुका होतात.. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कर्ज घेतो , मात्र त्यातून कोणती उत्पादकता होत नाही.. कर्ज घ्यायच , पुन्हा कर्जबाजारी व्हायच आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची..असं मी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोललो.. आज तीच अवस्था , विरोधकांना फक्त कर्जबाजारी हा मुद्दा मिळाला, असे विखे पाटील म्हणाले.
मी बेताल वक्तव्य कधी करत नाही : विखे पाटील
विखे पाटील पुढे म्हणाले, अनेक वर्ष मी सामाजीक जीवनात काम करतोय , मी बेताल वक्तव्य कधी करत नाही. माझा जो पहिला मुद्दा होता तो दाखवला नाही , कर्जबाजारी होतो आणि कर्जमाफी एवढाच मुद्दा पुढे आला संपूर्ण वृंत्तात जर दाखवला असता तर हा मुद्दा आला नसता.
सारवासारव केली पण तोपर्यंत...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केवळ विखे पाटीलच नाहीत...तर उपमुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना कर्जमाफीवरून सुनावलं होतं. तसेच माणिकराव कोकाटेंनीही अशाच प्रकारे बेताल वक्तव्य केलं होतं. कर्जमाफीच्या मुद्यावरून विखे पाटलांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या या वक्तव्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा विखे पाटलांनी केला. आपल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण होणार असल्याचा अंदाज आल्यानंतर विखे पाटलांनी सारवासारव केली होती. पण तोपर्यंत शाब्दाचा बाण सुटला होता
