मागील काही काळापासून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्र्वादी अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा वाद आणखीच तीव्र झाला. आरोप-प्रत्यारोपामुळे मागील काही दिवसात वातावरण तणावाचे झाले होते. आज या सगळ्याचे रुपांतर आजच्या राड्यात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच सुशांत जाबरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आज, सकाळी प्रभाग क्रमांक २ मधील मतदान बुथवर काही समस्या आली होती. या बुथवर भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आले होते. त्याच वेळी जाबरे यांचेही समर्थक आले होते. या दरम्यान, दोन्ही बाजूने शाब्दिक वाद झाला. या वादानंतर दोन्ही बाजूने राडा झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड केली. तर, जाबरे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनाही मारहाण केल्याचे समोर आले. या राड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
advertisement
आमच्यावर पिस्तुल रोखलं, विकास गोगावलेंचा आरोप
शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी म्हटले की, आम्ही बुथवर पाहणीसाठी आलो होतो. त्यावेळी काही अज्ञात व्यक्ती आले. काही कारमधून आलेल्या व्यक्तींकडे हॉकी, बॅट आढळली. आमच्यावर पिस्तुल रोखली गेली. कार्यकर्त्यांनी जीवावर उदार होत ही पिस्तुल काढून घेतली. ही पिस्तुल कोणाची आहे, याची चौकशी करून कारवाईची मागणी विकास गोगावले यांनी केली.
