TRENDING:

तटकरेंच्या जवळच्या माणसांनाच फोडलं, निवडणुकीआधी मंत्री गोगावले आणि दळवींचा धुमधडाका

Last Updated:

सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक सुरेश महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसहित शिंदे सेनेत प्रवेश केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रायगड : मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करत असल्याने सेनेची ताकद वाढत आहे.
सुनील तटकरे-भरत गोगावले
सुनील तटकरे-भरत गोगावले
advertisement

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरे यांचे जवळचे निकटवर्तीय आणि कोलाड आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुरेश महाबळे, त्यांच्या पत्नी, पंचायत समिती माजी सभापती सुनीता महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसहित आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी शिंदेसेनेची खेळी

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना रोह्यात प्रचंड सक्रीय झाली आहे. तटकरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखून कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न शिंदे यांची शिवसेना करीत आहे.

advertisement

तटकरे यांचे पदाधिकारी फोडण्याचा धडाका

तटकरे यांच्या जवळचे कार्यकर्ते-पदाधिकारी फोडण्याचा धडाका मंत्री गोगावले आणि थोरवे यांनी लावल्याने येत्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला अटीतटीचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सतत काही ना काही घडामोडी सुरू असतात. तटकरे आणि गोगावले यांच्यातील कडवा संघर्ष राज्यात चर्चेचा विषय असतो. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत खटके उडताना पाहायला मिळतात. सत्तेत असूनही दोन्ही पक्ष अनेकदा एकमेकांवर कुरघोडी करतात. त्यामुळे वरिष्ठ नेतृत्वाला हस्तक्षेप करून दोन्ही पक्षातील तंटे दूर करावे लागतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तटकरेंच्या जवळच्या माणसांनाच फोडलं, निवडणुकीआधी मंत्री गोगावले आणि दळवींचा धुमधडाका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल