विदर्भावर कमी दाबाचा पट्टा
हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रित यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोंथा चक्रीवादळाचं लॅण्डफॉल झाल्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झालं आहे. विदर्भाच्या काही भागांवर याचा परिणाम झाला आहे. तर सायक्लोनिक सर्क्युलेशन देखील तयार झालं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, गुजरातच्या दिशेनं देखील डिप डिप्रेशन येत आहे. त्यामुळे वादळी वारे वेगाने सुटले आहेत. पुढचे 36 तास महत्त्वाचे असणार आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातला अलर्ट देण्यात आला आहे. 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पुन्हा उत्तरेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 48 तास पावसाचे असणार आहेत.
advertisement
3 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम
31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तळ कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस राहणार आहे. मुंबईत पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. तळ कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 3 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कमी होणार असला तरी हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसानं मोठं नुकसान
निफाड तालुक्यात मुसळधार पावसानं कहर केला. नदी नाल्यांसह ओढ्यांना पूर आला आहे. या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं. पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिकच्या सुरगाणा भागात होत असलेल्या पावसाचा फटका भात शेतीला बसला आहे. काढणीला आलेलं पिक आडवं झालं. पावसाने शेतातील भात पिक भिजून खराब झालं आहे. नांदेड जिल्हाला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला. आज सकाळ पासून जिल्हयात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हदगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामूळे नदी नाल्यांना पूर आला होता.
मोंथामुळे कोकणात मोठं नुकसान
मोंथा चक्रीवादळाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसला. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान भातशेती पाण्याखाली गेली असून कापणीला आलेल्या पिकाला फटका बसला आहे. वाशिमच्या मालेगाव,रिसोड, मानोरा,मंगरुळपीरसह इतर भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचा कपाशी आणि तुरीला मोठा फटका बसला. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
