काही दिवसांसाठी विश्रांती घेतल्यानंतर हा आता पाऊस पुन्हा मुसळधार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत जबरदस्त कमबॅक केले आहे. कमबॅक केलेल्या ह्या पावसाने अनेकांचे नुकसान केले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही सतत सुरू आहे. अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. अनेक भागात 100 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये म्हणजेच शनिवारी सकाळी 8:30 ते रविवारी सकाळी 8:30 दरम्यान कुलाबा येथे सर्वाधिक 120 मिमी पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल जुहू 88 मिमी, सांताक्रूझ 83.8 मिमी, वांद्रे 82.5 मिमी, आणि महालक्ष्मी येथे 28 मिमी पावसाची नोंद झाली.
advertisement
सप्टेंबर महिन्यातील पहिला पंधरवडा कोरडा गेला. त्यानंतर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानाबरोबरच उकाड्यातही वाढ झाली होती. मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने मुंबई आणि उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट आणि नाशिक घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याचबरोबर काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सखलभागात पाणी साचण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.
पुढच्या काही तासांमध्ये हवामान विभागाने कोणत्या भागामध्ये कोणता अलर्ट जारी करण्यात आला. याबद्दलची माहिती जारी करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट, नाशिक घाट आणि कोल्हापूर घाट परिसर या भागामध्ये, हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये अति मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अर्थात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. जालना, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यामध्ये कोसळलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळित झाली होती. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या परिसरामध्ये अनेकांचे जीव गेले तर काहींच्या शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं तर पाणी पळालं आहे. तिथल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होते ना होते. तेच पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.